शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांचे पदाधिकाऱ्यांना आहवान
प्रतिनिधी / सोलापूर
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाच्या अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांना सोलापूरकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया सोलापूर शहर व जिल्ह्यात एमआयएमचा विस्तार करत असताना मुस्लिमांसह व इतर जाती व इतर जाती धर्मातील व्यक्तींनाही एमआयएम सोबत जोडण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन शहराध्यक्ष फारुख शाब्दि यांनी केले.
एमआयएमच्या कामगार संघटना जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्षपदी शकील शेख व वाहतूक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रियाज खरादी यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. या निवडीचे पत्र शाब्दि यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगरसेवक रियाज खरादी, वहिदा भंडाले, सलीम पामा, मोसिन मैंदर्गिकर , मोईन शेख ,अश्फाक बागवान, इक्बाल बांड, अल्ताफ मुजावर, रिजवान हवालदार यांची प्रमुख उपस्थिती होती. शाब्दि पुढे म्हणाले, एमआयएम ने कामगारांनी ,वाहतूक सेल तयार केला आहे. भविष्यात एमआयएमची विद्यार्थी आघाडी, महिला आघाडी व एमआर आघाडी तयार केली जाणार आहे. पक्षाच्यावतीने दिलेल्या पदाचा उपयोग फक्त पक्षाच्या कामासाठी करा, आपल्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला डाग लागणार नाही, याची काळजी घ्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.









