मडगाव : प्रतिस्पर्धी खेळाडूशी गैरवर्तन केल्याबद्दल एफसी गोवाचा कप्तान एदू बेडिया याला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या शिस्तपालने समितीने कारण दाखवा नोटीस बजावली आहे. बांबोळीतील जीएफसी स्टेडियमवर चेन्नईन एफसीविरूद्ध खेळताना त्याने इंज्युरी वेळेत चेन्नईनचा खेळाडू दीपक टांग्री याच्याशी गैरवर्तन केले होते. स्पेनच्या या खेळाडूला शिस्तपालन समितीने उत्तर देण्यासाठी आज 17 फेब्रुवारीपर्यंतची वेळ दिली आहे. चेन्नईन एफसीविरूद्धच्या लढतीत त्याला एलो कार्ड मिळाले होते. या आयएसएल फुटबॉल मोसमात चार एलो कार्डे पडल्याने इदू बेडियाला आज फातोर्डा स्टेडियमवर होणारी ओडिशा एफसीविरूद्धची लढत खेळायला मिळणार नाही.
Previous Articleचिपळुणातील गुटखा विक्रीवर कारवाई करणार
Next Article आज एफसी गोवाची लढत ओडिशाशी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.