नवी दिल्ली
देशात विदेशी गुंतवणूक व औद्योगिक व्यवसायांना दिल्या जाणाऱया परवानगी प्रक्रियेला वेग देण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम लागू केली जाण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. लवकरच ही प्रक्रिया अस्तित्वात येणार आहे. गुंतवणूकदारांना या नव्या सिस्टीमची सोय झाल्यास अन्यत्र खेपा माराव्या लागणार नाहीत. उद्योग जगतालाही यामुळे गुंतवणुकीसाठीचा मार्ग सोपा होणार आहे. यायोगे ते व्यवसाय विस्तार करू शकतील व यायोगे रोजगार संख्येतही वाढ करू शकणे शक्मय होणार आहे.









