2019-20 सालात 50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशामधील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) 2019-20 या कालावधीत 13 टक्क्मयांनी वधारुन 49.97 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. यामध्ये मागील 2018-19 आर्थिक वर्षात एकूण एफडीआय जवळपास 44.36 अब्ज डॉलर्सची होती. उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार समीक्षकांच्या आधारे देशातील सेवा क्षेत्राने 7.85 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असल्याची नोंद आहे.
अन्य क्षेत्रापैकी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्राने 7.67 अब्ज डॉलर्स, दूरसंचार क्षेत्राने 4.44 अब्ज डॉलर्स, व्यापार क्षेत्राने 4.57 अब्ज, वाहन क्षेत्राने 2.82 अब्ज डॉलर्स आणि निर्माण क्षेत्राने दोन अब्ज डॉलर्स आणि रसायन क्षेत्राने एक अब्ज डॉलर्सची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक प्राप्त केली असल्याचे सांगण्यात येत आहे.









