मंत्री पाऊसकर यांनी दिली माहिती
प्रतिनिधी / मडगाव
झुवारी पूलाचे 65 टक्के काम पूर्ण झालेले आहे. या पूलाचे काम करण्यासाठी चीनच्या सल्लागाराची नियुक्ती केली होती. आता जो निर्णय केंद्र सरकार घेईल, त्या निर्णयाप्रमाणे आम्हाला या पूलाचे काम पूर्ण करावे लागेल. या पूलाचे काम या वर्षी डिसेंबर महिन्यात पूर्ण व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. पण आता कोरोना व्हायरसमुळे एप्रिल 2021 मध्ये झुवारी पूलाचे काम पूर्ण करुन वाहतूकीसाठी हा पूल खूला केला जाईल. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊस्कर यांनी दिली.
मडगाव येथे मंगळवारी सार्वजनिक बांधकाम खात्यातील कंत्राटी पद्धतीवर असलेल्या कामगारांना सार्वजनिक बांधकाम सोसायटीमध्ये समावेश करण्यात आलेल्या कामगारांना नियुक्तीपत्रे बहाल करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे सरचिटणीस तथा फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक, नगरसेवक रुपेश महात्मे, नगरसेवक केतन कुरतकर, शर्मद रायतूरकर, नवीन पै रायतूरकर व अनिल रेगडे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी कंत्राटी कामगारांना न्याय दिला
माजी संरक्षण मंत्री व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 2015 साली ज्या कामगारांना सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटी पद्धतीवर कार्य करुन पाच वर्षे झाली होती अशांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सोसायटीमध्ये समावेश करुन त्यांना सरकारी कामगारा सारख्या सुविधा प्राप्त व्हाव्या यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेतला होता. पण तत्कालीन सार्वजनीक बांधकाममंत्री सुदीन ढवळीकर यांनी कोणताही निर्णय घेतला नसल्याने या कामगारांना न्याय मिळण्यात उशिर झाला. पण 2019 साली डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाल्याने त्यांनी या कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळवून दिला. तसेच पुर्वी कंत्राटी पद्धतीवर असलेल्या कामगारांना वेळेवर पगार सुद्धा मिळत नव्हता. त्यामुळे काही कामगारांना आमदारांच्या घरी जाण्याची पाळी येत होती. पण आता यावर सुद्धा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तोडगा काढलेला असून आता या सर्व कामगारांना वेळेवर पगार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कनिष्ठ अभियंता व तांत्रिक सहाय्यकपदे भरणार
कनिष्ठ अभियंता व तांत्रिक सहाय्यक पदे सार्वजनिक बांधकाम खात्यात रिक्त असून या सर्व पदांची भरती डिसेंबर महिन्या नंतर करण्यात येईल. जानेवारी वा फेब्रुवारी पर्यंत या सर्व पदांची भरती होईल. आम्हाला राज्यातील जनतेची चिंता असून तसेच भाजप हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष असल्याने राज्यातील जनतेची भाजपकडून चांगली कामे व्हावी यासाठी अपेक्षा असते. तसेच माजी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यासारखे आम्ही फोंडा व मडकई या भागातील लोकांना नोकरी मिळावी यासाठी आम्ही कार्य करत नाही. राज्यातील बाराही तालुक्याच्या मतदारसंघातील लोकांना सरकारी नोकरी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो असे मंत्री पाऊसकर म्हणाले.
डिसेंबर महिन्यापर्यंत मडगाव शहरात राहिलेल्या ठिकाणी हॉटमिक्स डांबरिकणाचे काम पूर्ण केले जाईल. प्रत्येकाने मल्लनिसारण योजनेची जोडणी घ्यावी यासाठी नोव्हेंबर महिन्यापर्यंत या प्रक्रिया पूर्ण केल्या जाईल. जे लोक मल्लनिसारणची जोडणी घेत नाही अशावर आम्हाला कारवाई करावी लागेल. कोणालाही पाण्याच्या समस्या भेडसावू नये यासाठी केंद्र सरकारच्या ‘जल जीवन मिशन’अंतर्गत दक्षिण गोव्यातील लोकांना साळावलीचे पाणी पोहचविले जाईल. तसेच लोकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठीही आम्ही प्रयत्न करू. वेस्टर्न बाय पास रस्ता या सासष्टीतील लोकांना विश्वासात घेऊन त्यांना ज्या पद्धतीने हा रस्ता हवा आहे त्याच पद्धतीने करुन दिला जाईल. या रस्त्यासाठी 175 कोटी रुपयांची आम्हाला गरज असल्याची कल्पना आम्ही केंद्र सरकारला दिलेली आहे. केंद्र सरकारने आम्हाला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे. साळ नदीचे बांधकामही लवकरात लवकर केले जाईल. यासाठी आम्हाला मडगाव नगरपालिकेच्या सहकार्याची गरज भासेल असे मंत्री पाऊस्कर म्हणाले.
भाजप लोकशाही पद्धतीने सरकार चालवत आहे. यात आम्ही कुणालाही त्रास देण्याची काम करत नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचे काम करत असतो. मुख्यमंत्र्याकडे आपण कोणतीही समस्या घेऊन गेलो तर ते लगेच त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करतात. ते मनोहर पर्रीकर सारखे सकारात्मक दृष्टीने काम कराणारे नेते आहे. आम्हाला मनोहर पर्रीकर यांच्या स्वप्नातला गोवा साकार करायचा आहे. त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहे.
राज्याच्या विकासासाठी जिथे आम्हाला झाडे कापावी लागेल तीथे आम्ही कापणार. पण, जेवढी झाडे आम्ही कापलेले आहे. तेवढी झाडे आम्ही पून्हा लावू. बाळ्ळी ते काणकोण पर्यंत रस्त्याच्या कामासाठी आम्हाला दोन हजार झाडे कापावी लागतील. तसेच सरकारच्या वतीने चार हजार झाडे पून्हा लावण्यात येईल. झाडे ही सजीव असून ती एकदा कापली तर पून्हा लावता येतात. पण राज्याचा विकास होणे हेही अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.









