कोरोनाशी लढा देणाऱयांविषयी आदर दर्शविणार
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
इंटरनेट सर्च इंजिन गुगलने कोरोना विषाणू साथीच्या विरोधात जागतिक लढाईमध्ये सहभागी असलेल्यांचा आदर राखत यंदा एप्रिल फूल साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2020 रोजी कोरोना विषाणूशी लढा देणाऱयांच्या प्रति थेट आदर दर्शविला जाईल, असे गुगल मार्केटिंगचे प्रमुख लोरेन टुहील यांनी नमूद केले आहे.
आम्ही यापूर्वी एप्रिल फूल साजरा न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 1 एप्रिल रोजी आमच्या विविध प्लॅटफॉर्मवर भरपूर मजेदार सामग्री ऑफर करण्यात येतात. मात्र, टीम अंतर्गत किंवा बाहेरून असे कोणत्याही प्रकारचे विनोद करणे टाळावे, असेही सांगण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डय़ुओ चॅटवरील वापरकर्त्यांची संख्या 8 वरून 12 पर्यंत
लोकप्रिय डय़ुओ चॅट ऍप्सच्या एका गटातील ग्रुप व्हिडिओ वापरकर्त्यांची संख्या 8 वरून 12 पर्यंत वाढविली आहे. जेणेकरून अधिकाधिक लोकांना गुंतवूण ठेवता येईल आणि ‘सामाजिक अंतर’चा अभ्यास करण्यात मदत होईल, असे सांगण्यात आले आहे.









