नवी दिल्ली
ऑनलाईन पद्धतीने पैसे भरण्याचे उत्तम माध्यम म्हणून युपीआयकडे पाहिले जाते. युपीआयच्या माध्यमातून होणाऱया व्यवहारात एप्रिलमध्ये घट झाली असल्याचे दिसून आले. युपीआय पेमेंटचे प्रमाण एप्रिलमध्ये 4 टक्के इतके घटले असल्याचे नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. स्थानिक स्तरावर लॉकडाऊनमुळे पेमेंटचे प्रमाण कमी झाले आहे. फास्टॅगच्या व्यवहारातही 15 टक्के इतकी घट झाल्याचे दिसून आले आहे. रोख व कार्डच्या माध्यमातून होणारे व्यवहार बऱयापैकी दबावात राहिले आहेत. युपीआय हे डिजिटल पेमेंटसाठी सुरक्षित माध्यम समजले जाते. लॉकडाऊनच्या कडक अमलबजावणीचा परिणाम ऑनलाईन रक्कम भरण्याच्या व्यवहारात दिसून आला आहे. याचा परिणाम मेमध्ये दिसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.









