वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनाबाधित दोन संशयित रुग्ण मिळाल्याने बुधवारी आणि गुरुवारी भाजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती कार्यकारिणी बैठकीमध्ये सोमवारी घेण्यात आला. बाजार समिती कार्यालयातील बैठकीच्या अध्यक्षस्थानी चेअरमन युवराज कदम होते.
यावेळी भाजी मार्केटच्या व्यापारी वर्गाने घेतलेल्या गाळेधारकांनी देय असलेल्या रक्कमेसाठी सवलत देण्याची विनंती केली. या शिवाय बाजार समितीमधील आवारात होत असलेल्या पार्किंगबद्दल चर्चा होऊन पार्किंग सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष महादेवी खमगौडर, माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, आनंद पाटील, तानाजी पाटील, मनोज मत्तीकोप, प्रमोद पाटील, महेश जुवेकर, सुधीर गड्डे, संजीव मादार उपस्थित होते.









