वार्ताहर /अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून जनावरांचा बाजार भरत आहे. मात्र, अद्याप या बाजारात मूलभूत सुविधा नसल्याने शेतकऱयांना दिवसभर ऊन-पावसात ताटकळत उभे राहावे लागत आहे.
एपीएमसी मार्केट यार्डमध्ये जनावरांचा बाजार दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात भरत आहे. या ठिकाणी बेळगाव तालुक्मयासह इतर तालुक्मयातील व जिल्हय़ामधील जनावरे विक्रीसाठी येतात. जनावरांच्या खरेदी-विक्रीची उलाढाल मोठय़ा प्रमाणात होते. आठवडय़ाच्या दर शनिवारी सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत जनावरांचा बाजार असतो.
पूर्वी किल्ला येथील भाजी मार्केटच्या बाजूला जनावरांचा बाजार भरत असे. या ठिकाणीही मूलभूत सुविधा नसल्याने प्रशासनाने एपीएमसीमध्ये जनावरांचा बाजार स्थलांतर केला. या ठिकाणी गेली दहा वर्षे जनावरांचा बाजार मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. मात्र, अद्याप याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने कोणत्याच मूलभूत सुविधा पुरविल्या नसल्याने शेतकरी व जनावर व्यापाऱयांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जनावरे बांधण्यासाठी दगडी किंवा लोखंडी खांब नाहीत. जनावरांसाठी शेडची उभारणी नाही. जनावरांना पिण्याच्या पाण्याची व चाऱयाची व्यवस्था नाही. येथे काही म्हशी व्यायल्यानंतर त्यांना पाणीही मिळत नाही. जनावरांना व शेतकऱयांना या ठिकाणी भर ऊन-पावसात दिवसभर ताटकळत उभे राहावे लागत आहे. तरीही कृषी उत्पन्न बाजार समितीने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे शेतकऱयांना व जनावरांना दिवसभर मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शौचालये नाहीत
दर शनिवारी या ठिकाणी जनावरांचा बाजार भरत असल्याने शेतकरी जनावरे विक्रीसाठी व खरेदीसाठी मोठय़ा संख्येने येतात. मात्र, या ठिकाणी शौचालय नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
हॉटेलमध्ये अस्वच्छता
या ठिकाणी चहा, भजी, जेवण, नाष्टय़ाची खोकी (टपऱया) उभारली आहेत. याच्या कडेलाच जनावरे बांधली जातात. बॅरलमध्ये पाणी भरून ठेवले जाते. या टपऱयांमध्ये शेतकऱयांची चहा-नाष्टय़ासाठी गर्दी असते. मात्र, या टपऱयांमध्ये स्वच्छताच नसते. यामुळे शेतकऱयांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्मयता आहे.
तरी कृषी उत्पन्न बाजार समितीने जनावरांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून जनावरांसाठी स्वच्छ, सुंदर बाजारपेठ बनवावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.









