50 किलो पिशवीचा भाव 1000 रु. : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बटाटा लागवडधारकांना
वार्ताहर / कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसाळी बियाणांच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. सोमवारपासून बियाणे नेण्यासाठी शेतकरी बांधवांची तुरळक प्रमाणात गर्दी सुरू आहे. बियाणांच्या 50 किलो पिशवीचा भाव 1000 रुपये असा आहे. गेल्या हंगामात याच बटाटय़ाचा भाव 1150 ते 1200 रुपये असा होता. बाजारात 4 ट्रक जालंधर बटाटा बियाणे सोमवारपर्यंत दाखल झाल्याची माहिती व्यापारी मोहन बेळगुंदकर यांनी दिली.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बेळगाव तालुक्मयामधील बटाटा लागवडधारकांना मोठय़ा प्रमाणात होत आहे. कारण शेतकरी बांधव ज्यावेळी बटाटा लागवड करतात, त्यावेळी निसर्ग साथ देत नाही. बटाटय़ाला पोषक असे वातावरण झाले तर बाजारात दर मिळत नाही. शिवाय गेल्या वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. अनेक बाजारपेठा बंद आहेत. हॉटेल व्यवसाय ठप्प झाले आहेत. साहजिकच बाजारामधील बटाटा उचल कमी झाली आहे. यासाठी बेळगाव बटाटा उत्पादक क्षेत्रामध्ये 600 ते 700 ट्रक बियाणे लागवड करण्यात येत होती. मात्र, काही वर्षापासून बटाटा लागवडीत कमालीची घट झाली आहे. गेल्या हंगामात 400 गाडय़ा बियाणांची लागवड झाली होती. या हंगामात 200 ते 250 गाडय़ा बटाटा बियाणे लागवडीची शक्मयता असल्याची माहिती व्यापारी टी. एस. पाटील यांनी
दिली.
हासनला बियाणे वाटप अंतिम टप्प्यात
कर्नाटकातील हासन जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात बियाणांची लागवड करण्यात येत आहे. पावसाळी बटाटा लागवडीत कर्नाटकाचा पहिला नंबर लागतो. त्यानंतर बेळगावचा नंबर लागतो. मे महिन्यापासून हासनला बियाणे वाटपाला तेथील व्यापारी बांधवांनी सुरुवात केली आहे. हासन या ठिकाणी बियाणांचा दर कमी असतो. कारण त्या ठिकाणी जालंधरहून रेल्वेद्वारे बटाटा येत असतात. तर बेळगावला ट्रकद्वारे बियाणे बाजारात आणले जातात. यावषी बेळगाव तालुक्मयामधील बटाटा उत्पादक क्षेत्रातील बटाटा लागवडीत शेतकरी बांधवांच्यात वर्षागणिक निरुत्साह दिसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.









