वेंगुर्ले /वार्ताहर-
बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटसनी जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून आज वेंगुर्ले उभादांडा-सागरेश्वर येथील सागर किनाऱ्याची स्वछता करून 35 पोती प्लास्टिक व, बॉटलस जमा केले. या स्वछता मोहीमसाठी एन.सी.सी ऑफिसरं लेफ्टनंट बी.जी. गायकवाड आणि 13 एस.डी व 14 एस डब्लू कॅडेटसनी स्वच्छेने पूढकार घेतला. या सर्व कँडेटना महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देउळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. आनंद बांदेकर, प्रा. वामन गावडे यासह अन्य प्राध्यापक उपस्थित होते.