ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही. रमण यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमण यांना शपथ दिली. सरन्यायाधीश शरद बोबडे शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी रमण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रमण हे आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश आहेत. 27 जून 2000 साली त्यांची आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. 10 मार्च 2013 ते 20 मे 2013 या कालावधीत त्यांनी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश पदाचे काम पाहिले आहे. रमण यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2022 पर्यंत असणार आहे.









