नवी दिल्ली
पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत असणाऱया एनसीसी कंपनीने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात सरकारी एजन्सीकडून 8,980 कोटी रुपयांची नवीन 15 कंत्राटे मिळाली आहेत. ही माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे. सदरची कंत्राटे ही एकूण किमतीमधील जीएसटी रक्कम वगळून दिली आहेत. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या एजन्सीकडून कंपनीला कंत्राटे प्राप्त झाल्याची माहिती आहे.









