नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी एनटीपीसी लडाखमध्ये देशातील पहिला हरित हायड्रोजन परिवहन प्रकल्प स्थापन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘एनटीपीसी आरईएल यांनी लडाख पेंद्रशासित प्रदेशात देशातील पहिल्या हायड्रोजन परिवहन प्रकल्पाची स्थापना करण्यासाठी करारावर सहय़ा केल्या असल्याचे समजते. एनटीपीसी आरईएल, एनटीपीसीच्या 100 टक्क्यांची हिस्सेदारी असणारी सहकारी शाखा आहे. करारावेळी लेहमधील सोलर ट्री आणि सोलर कार पोर्टच्या रुपामध्ये एनटीपीसीच्या पहिल्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे प्रारंभीच्या काळात एनटीपीसीकडून या क्षेत्रात पाच हायड्रोजन बस चालविण्याची योजना बनविण्यात आली आहे.









