नवी दिल्ली
एनटीपीसी रिन्युएबल एनर्जी कंपनीचा आयपीओ 2022-23 वर्षात भारतीय भांडवली बाजारात दाखल केला जाणार आहे. सदरच्या आयपीओ सादरीकरणातून कंपनी 50 हजार कोटी रुपये उभारणार आहे, असे सांगण्यात येते.कंपनीने आगामी काळात नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती कार्यात अधिक लक्ष केंद्रित करायचे ठरविले आहे. याकरिता आगामी काळात 2.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. 2032 पर्यंत 60 गिगावॅट (जीडब्ल्यू) इतकी क्षमता कंपनीला साध्य करायची आहे.









