नवी दिल्ली
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) (राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळ) व व्हॉट्सऍप यांनी एकत्र येऊन मुलांसाठी डिजिटल स्किल चॅम्पियनशीप प्रोग्रॅमचे आयोजन केले आहे.भारतातील युवकांना याअंतर्गत डिजिटल प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शाळा व विद्यापीठ स्तरावरील मुलांना डिजिटल कौशल्यावर आधारीत प्रशिक्षित केले जाणार आहे. यातील यशस्वी उमेदवारांना एनएसडीसी व व्हॉट्सऍपकडून प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.









