ऑनलाईन टीम / नदिया :
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरून (एनआरसी) केंद्रातील भाजप सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढलवला आहे.
त्या म्हणाल्या, आसाममध्ये एनआरसीमुळे आतापर्यंत 100 जणांचा बळी गेला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये एनआरसीच्या भीतीने 31 जणांचा मृत्यू झाला आहे. नदिया जिह्यात आयोजित एका सभेत त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, देशात आधीच सीएए आणि एनआरसीवरून आंदोलनांचा वणवा भडकलेला असतानाच भाजपशी असहमत असलेल्या प्रत्येकाला दहशतवादी ठरवण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या भाजपकडून सुरु आहे.









