ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘एड्स’ रोगावर उपचार करणारे औषध सापडल्याचा दावा फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलोच्या संशोधकांनी केला आहे.
संशोधक डॉ. रिकार्डो डियाज म्हणाले, ब्राझीलमधील एका HIV पॉझिटिव्ह व्यक्तीला उपचारादरम्यान अँटीरेट्रोव्हायरल औषधे आणि निकोटिनामाईड औषधांचे मिश्रण दिले. एक वर्षानंतर, जेव्हा या रुग्णाची रक्त तपासणी केली गेली, तेव्हा त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.
या औषधांच्या मिश्रणामुळे ही व्यक्ती एड्सपासून मुक्त झाली आहे. लवकरच जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) याबाबत माहिती देण्यात येईल, असे युनिव्हर्सिटी म्हटले आहे. तर या औषधांवर अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचे कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील एड्स विशेषज्ञ डॉ. मोनिका गांधी यांनी म्हटले आहे.









