वृत्तसंस्था/ पॅरीस
सोमवारी घोषित करण्यात आलेल्या एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत प्रेंच ग्रॅण्ड स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणारा ग्रीकचा 22 वर्षीय सित्सिपसने चौथे स्थान मिळविले आहे. या ताज्या यादीत सर्बियाच्या जोकोविचने आपले अग्रस्थान अधिक मजबूत केले आहे.
एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सर्बियाच्या जोकोविचने 12113 गुणांसह पहिले, रशियाचा मेदव्हेदेव 10143 गुणांसह दुसरे, स्पेनचा नदाल 8630 गुणांसह तिसऱया, ग्रीकचा सित्सिपस 7980 गुणांसह चौथ्या, ऑस्ट्रीयाचा थिएम 7425 गुणांसह पाचव्या, जर्मनीचा व्हेरेव्ह 7350 गुणांसह सहाव्या, रशियाचा रूबलेव्ह 5910 गुणांसह सातव्या, स्वीसचा फेडरर 5065 गुणांसह आठव्या, इटलीचा बेरेटेनी 4103 गुणांसह नवव्या आणि स्पेनचा बॉटिस्टा 3170 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.









