तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
एटीएम कार्डची अदलाबदल करून भामट्यांने 92 हजारांची रोकड काढून घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत गेनप्पा विश्वनाथ छप्पे कर वय61 रा. सरस्वती नगर शेळगी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी इस्माविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे बाळीवेस येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेली होते. त्यावेळी अनोळखी इसम एटीएम सेंटरमध्ये थांबला होता. त्यास फिर्यादीने तुमचे काम झाले असल्यास बाहेर या, असे सांगितले. परंतु त्या इसमाने तुम्ही आत येऊन पैसे काढू शकता असे सांगून तो तेथेच थांबला. फिर्यादी आत जाऊन पैसे काढत असताना तो इसम त्यांच्याजवळ आला व त्याने बोलण्यात गुंतवून त्याच्या जवळील दुसरे एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकले. फिर्यादीचे कार्ड त्याने स्वतःजवळ ठेवले. तिथून तो निघून गेला. काही वेळानंतर फिर्यादीच्या खात्यातील 92 हजारांची रोकड काढून घेतल्याचा एसएमएस प्राप्त झाला. अधिक तपास फौजदार धायगुडे हे करीत आहेत.









