बांदा/ प्रतिनिधी-
सरकारने सोन्याच्या दागिन्याची विक्रीसाठी होलमार्कची सक्ती केली आहे. 16 जून 2021 पासून त्याची अमलबजावणी करण्यात आली. शासनाच्या या निर्णयाचा सुवर्णकार सराफ स्वागत करत आहेत त्याचा स्वीकार पण केला आहे.त्यात अधिक भर म्हणून सरकार एचयूआयडीची सक्ती करत आहे.त्याला आमचा विरोध आहे.असे लेखी निवेदन बांदा दैवज्ञ सुवर्णकार संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांना बांदा येथे गेले.
यावेळी दैवेज्ञ बांदा सुवर्णकार संघाच्या अध्यक्ष रवींद्र मालवणकर, उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर, सल्लागार अण्णा धारगळकर, मंगलदास साळगांवकर, साईराज साळगांवकर, बाबू चिंदरकर व सुवर्णकार बांधव उपस्थित होते.
यात त्यांनी म्हटले कि, सरकारच्या होलमार्क सक्तीच्या निर्णयाचे सुवर्णकारनी स्वागत केले.शासनाकडून त्यात अधिक भर म्हणून एचयूआयडीची सक्ती करत आहेत. एचयूआयडीची अमलबजावणी जाचक ठरणार आहे. लहान मोठे सुवर्णकार सराफ नष्ट होऊन मोठ्या कार्पोरेट कंपनीच्या हाती व्यवसाय जाणार आहे. सुवर्णनियंत्रण कायद्यासारखाच हा प्रकार आहे. यामुळे अनेक लहान सुवर्णकार सराफ यांना आपला पिढीजात व्यवसाय बंद करण्याची पाळी येणार आहे.सराफ संघटनेचे अध्यक्ष फत्तेचन्द रांका याविरोधात झगडत आहे.आपणही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून आमच्या पाठीशी रहावे अशी मागणी निवेदनातू केली आहे.









