बाजारमूल्यामध्येही अव्वल कामगिरीकडे वाटचाल
वृत्तसंस्था/ मुंबई
एचडीएफसी समूहाने मागील आठवडय़ात देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स समूहाला बाजारमूल्यात (एम-कॅप) पाठीमागे टाकले होते. एचडीएफसी समूह इन्फोसिससारखी कंपनी आहे. जी व्यावसायिक पातळीवर चालविण्यात येते. कारण सदर समूहाची कोणत्याही व्यक्ति किंवा कुटुंबाकडे 4 टक्केही हिस्सेदारी नसल्याची माहिती आहे.
एचडीएफसीमध्ये कोणत्याही प्रकारची ओनरशिप नाही. संपूर्ण समूहाची जवळपास 74 टक्क्यांची हिस्सेदारी ही विदेशी संस्थात्मक गुंतवणूकादारांजवळ (एफआयआय) अन्य देश आणि अन्य दुसऱया गुंतवणूकदारांकडे आहे.
संपूर्ण समुहाच्या व्यवहाराच्या कामगिरीतून मार्च 2020 मध्ये समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात एकूण महसूल 2.51 लाख कोटी रुपयांवर राहिला आहे. एकूण फायदा हा 50 हजार 250 कोटी रुपयांवर राहिला होता.
एचडीएफसी बँक
8 नोव्हेंबर 1995 रोजी एचडीएफसी बँकेचे समभाग शेअर बाजारात लिस्ट झाले तेव्हा बाजारमूल्य 400 कोटी रुपये होते. मार्च 2020 मध्ये बँकेचा एकूण महसूल 1.14 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिला आहे.
एचडीएफसी लिमिटेड
सदर समूहातील दुसरी सर्वात मोठी कंपनी एचडीएफसी लिमिटेड आहे. ही प्रामुख्याने हाऊसिंग फायनान्स क्षेत्रात कार्यरत असून महसूल कमाई 1.01 लाख कोटी रुपये आहे. नफा 21,434 कोटी रुपये राहिला आहे.
एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स
सदरची कंपनी ही तिसरी मोठी इन्शुरन्स क्षेत्रातील व्यवसायात कार्यरत आहे. या कंपनीचा महसूल 32 हजार 244 कोटी रुपये आहे. नफा कमाई 1,297 कोटी रुपयांवर राहिली आहे.
चौथी कंपनी म्युच्युअल फंड
चौथी कंपनी म्युच्युअल फंडच्या व्यवसायात आहे. एचडीएफसी असेट्स मॅनेजमेंटचा महसूल 2,143 कोटी रुपये असून नफा 1,262 कोटींच्या घरात आहे. 53 हजार कोटींचे बाजारमूल्य आहे.









