टाटाच्या 28 कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड : सात लाखाहून अधिक कर्मचारी संख्या
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनामुळे देशात सर्व क्षेत्रे आता हळुहळू पूर्ववत येत आहेत. काही व्यवसाय अद्यापही बंद अवस्थेत आहेत. याचदरम्यान काही कंपन्यांना लाभ झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये टाटा समूहातील कंपन्यांनी समाधानकारक नफा कमाई केली आहे. टाटाच्या लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 14.27 लाख कोटी रुपयांवर राहिले आहे. या मजबूत कामगिरीमुळे टाटा समूहाने रिलायन्स आणि एचडीएफसी समूहांना मागे टाकले आहे. एचडीएफसी समूह दुसऱया नंबरवर असून याचे बाजारमूल्य 13.72 लाख कोटी रुपये आणि रिलायन्सचे 12.27 लाख कोटी रुपयांवर राहिले
आहे. तसेच टाटा समुहातील 28 कंपन्या लिस्टेड आहेत. यामधील 8 कंपन्यांचे बाजारमूल्य 20 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिल्याची नोंद केली आहे.
वाटचाल टाटाची
टाटा समूहाची स्थापना 1868 मध्ये झाली होती. याची स्थापना ही जमशेदजी टाटा यांनी केली होती. 10 क्लस्टर्समध्ये यांच्या 30 पेक्षाही अधिक कंपन्या आहेत. समूहाचा व्यवसाय हा तब्बल 100 पेक्षाही अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. टाटा कंपन्यांचा प्रमोटर टाटा सन्स आहे. 2018-19 मध्ये टाटा समूहाचा एकूण महसूल 792,719 कोटी रुपये होता. तसेच यामध्ये 7.20 लाख कर्मचारी संख्या असल्याची नोंद असून यांच्या 28 कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड असल्याची माहिती आहे.
टॉप लिस्टेड कंपन्या
| कंपनी | महसूल | फायदा | बाजारमूल्य |
| टाटा कंझ्युमर | 5,690 | 5,23 | 48,293 |
| वोल्टास | 7,357 | 570 | 25,236 |
| टाटा कम्युनि. | 5,750 | 208 | 28,256 |
| टेंट लिमिटेड | 3,177 | 154 | 27,372 |









