एस्सेल गुपसोबतच्या वादावर तडजोड करण्यासाठी निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिग्गज म्युच्युअल फंड कंपनी एचडीएफसी म्युच्युअल फंड आणि सर्वोच्च व्यवस्थापकांनी बाजार रेग्युलेटर सेबीला 4.2 कोटी रुपय्यांची रक्कम जमा केली आहे. ही रक्कम जमा करुन कंपनीने एस्सेल गुपसोबत असणाऱया वादाला पूर्णविराम देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. ही रक्कम एस्सेल ग्रुपचे डेट संसाधनांमध्ये गुंतवणूक करण्यात आली असल्याचे यावेळी सेबीकडून सांगण्यात आले आहे.
सेबीकडून देण्यात आलेल्या आदेशावरुन म्युच्युअल फंडाची नियमावली पूर्ण करण्यात उल्लंघन करण्यात आले होते. फेबुवारी 2019 मध्ये सुभाष चंद्रा यांनी एस्सेल ग्रुप ऑफ कंपनीजने बाँड होल्डर्सच्या वेळी पेमेंट करण्यात असमर्थता दाखवली होती. त्यानंतर फंड हाऊसने नवीन करार करुन एस्सेल ग्रुपने सदरची रक्कम जमा करण्याचा कालावधी वाढविला होते.
रेग्युलेटरकडून हा वाद मिटविण्यसाठी तडजोड करण्यात आली आहे. ज्यावेळी एचडीएफसी म्युच्युअल फंडने गुंतवणूक प्रभावीत झाली होती. म्युच्युअल फंडच्या योजनेच्या माध्यमातून 4.4 कोटी रुपयाचे देणे दिले आहे.









