सेन्सेक्स 214 तर निफ्टी 59.40 अंकांनी वधारलेत
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि एशियन पेन्ट्ससारख्या मोठय़ा कंपन्यांच्या कामगिरीमुळे एक दिवस अगोदर गुरुवारी सलगची तेजी गमावली होते. परंतु वरील कंपन्यांमुळे गमावलेली तेजी पुन्हा सेन्सेक्सने प्राप्त केल्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रमुख कंपन्यांच्या लिलावामुळे सेन्सेक्स 214 अंकांनी तेजीत राहिला आहे. जागतिक बाजारातील सुधारणामुळे ही मजबूत स्थिती प्राप्त केल्याचेही अभ्यासकांनी म्हटले आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 214.33 अंकांनी वधारुन निर्देशांक 38,434.72 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 59.40 अंकांनी तेजी प्राप्त करुन 11,371.60 वर स्थिरावला आहे.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये एनटीपीसीचे समभाग सर्वाधिक पाच टक्क्मयांनी तेजीत राहिले असून सोबत पॉवरग्रिड, एशियन पेन्टस, एचडीएफसी बँक, सन फार्मा, नेस्ले इंडिया, स्टेट बँक, आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग वधारले आहेत. दुसऱया बाजूला ओएनजीसी, भारती एअरटेल, टाटा स्टील आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभागाचा प्रवास नुकसानीत राहिला आहे.
बाजारातील कामगिरी संदर्भात काही व्यवसायाच्या आधारे व जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे स्थानीक बाजार कमाईत राहिले आहेत. तर अन्य आशियाई बाजारात चीनचा शांघाय कम्पोजिट, हाँगकाँगचा हँगसेंग, जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा बाजार नफ्यात राहिला आहे. प्रारंभीच्या काळात युरोपीय बाजार लाभात राहिले होते. जागतिक बेंचमार्क ब्रेंट कच्चे तेल 0.71 टक्क्मयांनी नुकसानीसोबत 44.58 डॉलर प्रति बॅरेलवर आले आहे. तर अंतर बँक विदेशी मुद्रा विनिमय बाजारातील रुपया 18 पैशांनी वधारुन 74.84 प्रति डॉलरवर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.








