कसबा बीड / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील कोगे गावामध्ये वारकरी संप्रदाय कडून अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला. कोरोनाव्हायरस या संसर्गजन्य रोगामुळे सर्व भारतभर थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवरती केंद्र व महाराष्ट्र शासनाने हा संसर्गजन्य रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून यावर्षी होणाऱ्या सर्व यात्रा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. इतिहासामध्ये दुसऱ्यांदा अशा पद्धतीचा प्रसंग उद्भवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांचे आराध्य दैवत म्हणून विठू माऊलीची सालाबाद प्रमाणे होणारी आषाढी वारी रद्द करण्यात आली.
त्यामुळे लाखोच्या उपस्थित वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना घरीच थांबण्याचा व आपल्या गावामध्ये झाडे लावण्याचे शासनाकडून सुचवले आहे.
भोगावती नदीच्या तीरावर वसलेले व त्रिवेणी संगम असलेले गाव म्हणून कोगे गावाची ख्याती भागामध्ये आहे. या गावांमध्ये विठ्ठल-रखुमाई, हनुमान महादेव, जोतिबा, ग्रामदैवत चाळकोबा व मिनि बाळेकुंद्री म्हणून ओळखले जाणारे श्री पंत व दत्त मंदिर आदी मंदिरे आहेत. यामध्ये विठ्ठल रुक्माई मंदिरातील वारकऱ्यांनी यावर्षी वारीला जाता येत नाही, या गोष्टीचे त्यांना दुःख झाले. पण त्यातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून गावाबाहेर असणाऱ्या व नव्याने उभारलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या या निर्णयाने सर्व आबालवृद्धांना व गावकऱ्यांनाही आनंद झाला.
कोगे गावातील नव्याने घडणारी भावी पिढी नैसर्गिक वातावरणामध्ये तिची वाढ व्हावी व शाळेलाही सुशोभीकरण यावी, या हेतूने अनोखा उपक्रम घेतला. हा अनोखा उपक्रम गावातील कुंभी कासारीचे संचालक पी के पाटील सर व ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र वेदांते, ग्रामसेवक आंबेकर साहेब,उपसरपंच, सदस्य कृष्णात फडतारे, कुमार शाळेचे मुख्याध्यापक सौ. एम एम यादव, कन्या शाळेचे मुख्याध्यापक जी के पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश कुंडलिक पाटील हे होते. वृक्षारोपणसाठी युवा वर्गाकडून शुभम पाटील, सौरभ पाटील, प्रतिक शिर्के, महेश पाटील, शिवाजी चव्हाण, व ग्रामपंचायत कर्मचारी रणजित सातपुते यांचेकडून खड्डे काढणे व बुजवण्याचे काम करण्यात आले. युवा वर्गाकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे गावात त्यांची प्रशंसा होत आहे. यावेळी वारकऱ्यांच्यामधून कृष्णात घराळ, गोविंद मिठारी, महादेव मांगोरे, दिनकर पाटील, बापू परीट, आक्काताई मोरे , महादेव पाटील व इतर उपस्थित होते.
Previous Articleगडमुडशिंगी विजवितरण कार्यालयास बांधले वाढीव बिलांचे तोरण
Next Article बेळगाव जिह्यातील आणखी सात अहवाल पॉझिटिव्ह








