प्रतिनिधी / सांगली
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक रकमी एफ.आर.पी.साठी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर क्रांती सह. साखर कारखान्याचे घोगाव(ता,पलूस) येथील गट कार्यालय मंगळवारी मध्यरात्री अज्ञातांनी पेटवून दिल्याने परीसरात एकच खळबळ माजली असून एकरकमी ऊस दरासाठी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर हे कार्यालय पेटल्याने या परीसरातील शेतकर्यांनीच हे कार्यालय पेटवुन दिल्याची चर्चा असून या घटनेची नोंद बुधवार सायंकाळपर्यंत पोलीसात झाली नव्हती.








