जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांचा प्रभारी एच. के. पाटील यांना विश्वास
.
प्रतिनिधी / कोल्हापूर
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील कोणतीही एक जागा महाविकास आघाडीतून राष्ट्रीय काँग्रेसकडे घ्यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केली. उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी माझी असेल, असा विश्वासही त्यांनी दिला. काँग्रेस प्रभारी पाटील हे ट्रक्टर रॅली निमित्त कोल्हापुरात आले होते. यावेळी सतेज पाटील यांनी त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला.
विधान परिषदेसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील सर्व जागा महाविकास आघाडीकडून लढवण्यात येणार आहेत. वरिष्ठ पातळीवर जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. यापार्श्वभूमीवर पुणे मतदारसंघाबाब मंत्री पाटील यांनी आग्रह धरला आहे.
पुणे विभागात पदवीधर, शिक्षक अशा दोन जागा आहेत. कोल्हापूर, सांगली, साताऱयामध्ये पक्षाची नोंदणी युद्धपातळीवर झाली आहे. येथील मतांची बेरीज केल्यास कॉग्रेस उमेदवार निवडून येण्यात कोणतही अडचण नाही. गेली वर्षभरापासूत काँगेसच्यावतीने मतदात टू मतदार संपर्क मोहीम राबवली आहे. निवडणुकीजे काटेकोर नियोजन तयारी केली आहे. सांगीलतून विश्वजित कदम, कोल्हापुरातून मी स्वत: आणि पक्षाचे चारही आमदार पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करतील. असा विश्वास मंत्री पाटील यांनी दिला. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हÎातील कॉग्रेस आमदार आदी उपस्थित होते.