केंद्र सरकारने कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱया व्यक्तींची आरटी-पीसीआर चाचणी करविणे अनिवार्य केले आहे. परंतु अनेक जण रॅपिट अँटीजेन टेस्टसंबंधी सवाल उपस्थित करत आहेत. अनेकदा कोरोना चाचणी केल्यावर एकदा पॉझिटिव्ह तर एकदा निगेटिव्ह अहवाल येत आहे. अशा स्थितीत छातीच्या एक्स-रेद्वारेही कोरोनाचा संसर्ग आहे की नाही पाहिले जाऊ शकते.
एक्स-रे कधी करावा?
अनेक ठिकाणी कोरोनासाठी चेस्ट एक्स-रेही केला जातोय. आरटी-पीसीआर चाचणीत नाक आणि गळय़ात द्रावनमुने घेऊन चाचणी केली जाते. परंतु विषाणू गळय़ातून फुफ्फुसांमध्ये पोहोचला असल्यास आणि न्युमोनिया झाला असल्यास एक्स-रेतून विषाणूचा प्रभाव कमी आहे का अधिक हे समजू शकते. विषाणू फुफ्फुसात पोहोचल्यावर अत्यंत वेगाने वाढू लागतो.
पॉझिटिव्ह अन् निगेटिव्ह
लक्षणे असूनही रॅपिड ऍटीजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह आल्यास डॉक्टर आरटी-पीसीआर करतात. तेव्हा अनेकदा अहवाल पॉझिटिव्ह येतो. परंतु प्रत्यक्षात अनेक लोक सामान्य सर्दी-खोकल्याने ग्रस्त असतात. याचमुळे त्रास करून घेण्याची गरज नाही. रॅपिड अँटीजेन चाचणीला पूर्णपणे विश्वासार्ह मानले जात नसल्यानेच आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते. कोरोनाची चाचणी शासकीय रुग्णालयातच जाऊन करा असा सल्ला दिला जात असल्याचे डॉ. संजय पांडे यांनी सांगितले आहे.
मास्क लावून 70 टक्के सुरक्षित
मास्क लावून स्वतःला 70 टक्क्यांपर्यंत सुरक्षित ठेवता येऊ शकते. गर्दी असलेल्या ठिकाणाहून लवकर निघा असा सल्ला डॉ. संजय यांनी दिला आहे. गर्दी जर बंदिस्त जागेत असल्यास अधिक धोका आहे. खुल्या जागेत संसर्ग फैलावण्याची शक्यता कमी असते. याचबरोबर हात धुवत रहावेत. जर कुणामध्ये लक्षणे दिसून येत असली किंवा बाधिताच्या संपर्कात आल्यास त्याने संसर्ग होईलच असे नाही. सर्वात आवश्यक रुग्णालयात जाऊन चाचणी करविणे आहे. चाचणी न करणे मूर्खपणाचे ठरणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.









