‘एक थी बेगम’ ही कथा सत्य घटनेवर प्रेरित असून रागावलेली, सुडाची भावना उराशी बाळगून असलेली स्त्री ही सर्वात भयंकर असते. ही उक्ती बेगमच्या गोष्टीला अनुरूप आहे. 1980 मध्ये जेव्हा अशा गुन्हेगारी प्रवफत्तीच्या लोकांचा काळावर विस्मयकारक पगडा होता त्या काळातील बेगमची ही कथा एम एक्स प्लेयर वेब सिरीजच्या माध्यमातून घेऊन आले आहे.
अश्रफ भाटकर उर्फ सपना (अनुजा साठे) सुंदर, धाडसी अशा स्त्राrच्या आयुष्याची कथा एक थी बेगमच्या रुपात मांडण्यात आली आहे. शहरातील सर्वात मोठा डॉन मकसूद (अजय गेही) हा अश्रफचा नवरा झहीर (अंकित मोहन) याच्या मफत्यूसाठी जबाबदार आहे हे कळल्यावर अश्रफचे पूर्ण आयुष्याच बदलून जाते. एक थी बेगम ही अश्रफ उर्फ सपनाची कहाणी जिने तिच्या पतीच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. ही वेबसिरीज एम एक्स प्लेयरवर प्रदर्शित झाली आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित 14 भागाची ही सिरीज त्यांनीच लिहिली आहे. या वेबसिरीज विषयी सचिन दरेकर सांगतात, “ही कथा एका असामान्य स्त्राrची आहे जी स्वत:च्या अस्तित्वासाठी आणि स्वत:च्या माणसांसाठी किती आणि काय करू शकते हे सांगते. कथेतील सर्वच पात्र फार महत्वाची कामगिरी या कथेत बजावत आहेत, आणि सगळय़ाच कलाकरांनी ती पात्र जिवंत उभी केली आहेत. अनुजा साठे या वेबसिरीजमध्ये अश्रफ भाटकर ऊर्फ सपनाची मुख्य भूमिका साकारत आहे. अशा असामान्य भूमिकेबद्दल अनुजा सांगते “आपण सहसा पुरुषांनी माफिया-डॉनवर साकारलेले चित्रपट आणि गोष्टी पाहिल्या आहेत. ही गोष्ट एका स्त्राrची आहे जी स्वत:च्या दु:खावर मात करून माफिया क्वीन बनते. यापूर्वी विविध प्रकारच्या भूमिका मी साकारल्या आहेत, पण अशी आव्हानात्मक भूमिका मला माझ्या हातून जाऊ द्यायची नव्हती. अश्रफच्या आयुष्यात तिच्या अनेक छटा आहेत आणि त्या मी पडद्यावर साकारणं हे आव्हानात्मक होतं. त्यात माझी अमाप भावनिक आणि मानसिक गुंतवणूक झाली. आशा करते की, सिरीज करताना आम्ही जो आनंद अनुभवला तोच आनंद प्रेक्षक सिरीज पाहिल्यावर अनुभवतील आणि आमच्या कामाला नक्कीच योग्य ती दाद देतील.’’
अनुजा साठे यांच्यासह अंकित मोहन, चिन्मय मांडलेकर, राजेंद्र शिरसाटकर, रेशम, अभिजीत चव्हाण, प्रदिप डोईफोडे, विठ्ठल काळे, नाझर खान, विजय निकम, अनिल नगरकर, सुचित जाधव, राजू आठवले आणि संतोष जुवेकर हे ही या वेबसिरीजमध्ये महत्वाच्या भूमिकेत आहेत.









