बेंगळूर/प्रतिनिधी
जनता दलाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी विजेच्या दर वाढीवर वक्तव्य केलं आहे. कुमारस्वामी यांनी एक वर्ष वीज दर वाढ करू नये अशी विनंती त्यांनी राज्य सरकारला केली आहे. कुमारस्वामी यांनी कोरोनामुळे लोक गंभीर आर्थिक परिस्थितीला सामोरे जात आहेत. अनेकांचे काम गेले आहे. तसेच पगारामध्ये मोठी कपात झाली आहे. अशा परिस्थितीत विजेचे दर वाढविणे योग्य नसून ते पुढे ढकलणे योग्य ठरेल असे ते म्हणाले.
सरासरी ४० पैसे प्रति युनिट वाढ
कुमारस्वामी यांनी वाढीव वीज दर मागे घेण्याची सरकारला विनंती करताना त्यांनी सरासरी साधारण ४० पैसे प्रति युनिट दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढतील. उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांतील पुराचा संदर्भ देताना त्यांनी या परिस्थितीत दर वाढवणे लोकांच्या हिताचे नसल्याचे म्हंटले आहे.
राज्य विद्युत नियामक आयोगाने (केईआरसी) चालू आर्थिक वर्षात वीज दरामध्ये सरासरी ४० पैसे वाढीला बुधवारी मंजुरी दिली. ही वाढ सुमारे ५.४० टक्के आहे. नवीन दर एप्रिलऐवजी नोव्हेंबरपासून लागू होतील, ही बाब ग्राहकांना दिलासा देणारी आहे.
विद्युत पुरवठा कंपन्यांनी (आयस्कॉम्स) प्रति युनिट १.२६ रुपये दर वाढीची मागणी केली होती. तथापि, केईआरसीने सर्व श्रेणींमध्ये प्रति युनिट ४० पैसे वाढीला मंजुरी दिली. तसेच नवीन दर १ नोव्हेंबर २०२० पासून लागू होतील असे म्हंटले आहे.