वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नॅशनल हायवे ऍथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) नवीन सुविधा वापरणाऱया फास्टॅगच्या ग्राहकांसाठी आता आपल्या खात्यामधील शिल्लक रक्कमेची माहिती एका मिस्डकॉची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ज्या फास्टॅग ग्राहकांनी आपला मोबाईल नंबर नोंदणी केला आहे. त्यांच्या मोबाईल नंबरवर 91-8884333331 या क्रमांकावर मिस्डकॉल दिल्यास त्यांना एनएचएआयच्या प्रीपेड वॉलेटमधील शिल्लक रक्कमेची माहिती मिळणार आहे. हा नंबर चोवीस तास कार्यरत राहणार असून सर्व मोबाईल वापरणाऱया ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती एनएचएआयकडून देण्यात आली आहे.








