लिलावात मिळणार कोटय़वधी रुपये
ब्रिटनमध्ये एका व्यक्तीच्या हाती असे सोन्याचे नाणे लागले आहे, ज्याचे मूल्य कोटय़वधी रुपयांमध्ये आहे. हे नाणे आता त्या व्यक्तीचे नशीबच बदलणार आहे. विल्टशायर क्षेत्रात मेटल डिटेक्टरच्या मदतीने एक अत्यंत दुर्लभ अँग्लो-सॅक्सन नाणे शोधण्यात आले आहे.
लिलावात या नाण्याची किंमत 2,00,000 युरो म्हणजेच 1,76,77,00 रुपयांपर्यंत असू शकते. 5 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे हे सोन्याचे नाणे वेस्ट सॅक्ससनचे राजे एक्गबरहट यांच्या काळातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
8 सप्टेंबर रोजी होणाऱया लिलावात एकमात्र या अँग्लो सॅक्ससन सोन्याच्या नाण्याची सुमारे 2 कोटी रुपयांमध्ये विक्री होण्याची अपेक्षा आहे. मागील अनेक वर्षांपासून एखाद्या खजिन्याच्या शोधात असलेल्या व्यक्तीला हे नाणे गवसले आहे.
हे नाणे पाहणे अत्यंत रोमांचक आहे. या सम्राटाच्या शासनकाळातील सोन्याचे नाणे आतापर्यंत पूर्णपणे अज्ञात होते असे लिलावकर्ते डिक्स नूनन वेबचे नाणे विभाग प्रमुख पीटर प्रेस्टन-मॉर्ले यांनी म्हटले आहे. नाण्यात उच्च शुद्धतेच्या सोन्यासह चांदी आणि तांब्याचाही वापर करण्यात आला आहे. अशाप्रकारच्या शुद्धतेचे सोने विशेष स्वरुपात लवचिकत असल्याने ते तुटण्याची शक्यता अधिक असते.