अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 22 मार्च 2022, सायंकाळी 5.15
● 29 सक्रिय रुग्ण
● 42 लाख 65 हजार जणांचं टूचुक
● टूचुकमध्ये खंडाळा प्रथम, महाबळेश्वर द्वितीय, सातारा तृतीय
● गंभीर रुग्ण आणि मृत्यू निरंक
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील मंगळवारी जाहीर करण्यात आलेला अहवाल पाहता नव्याने 3 जण बाधित आढळून आले असून 11 जण कोरोना मुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील 29 रुग्ण सक्रिय असून एकही गंभीर नाही. कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. हे चित्र जिल्ह्याच्या दृष्टीने चांगले आहे.
जिल्ह्यात 42 लाख 65 हजार जणांना टुचुक
सातारा जिल्ह्यातील 42 लाख 65 हजार 877 जणांना टुचुक करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वात जास्त खंडाळा तालुक्यात 2 लाख 53 हजार 49 जणांनी तर दुसऱ्या क्रमांकावर महाबळेश्वर तालुक्यातील 1 लाख 12 हजार 246 जणानी, सातारा तालुक्यातील 8 लाख 11 हजार 936 जणांनी, जावली तालुक्यातील 1 लाख 42 हजार 926 जणांनी, कराड तालुक्यातील 8 लाख 29 हजार 957 जण, खटाव तालुक्यातील 3 लाख 86 हजार 61, कोरेगाव तालुक्यातील 3 लाख 54 हजार 669, माण तालुक्यात 2 लाख 73 हजार 232, पाटण तालुक्यातील 3 लाख 62 हजार 237, फलटण तालुक्यातील 4 लाख 69 हजार 717, वाई तालुक्यातील 2 लाख 69 हजार 847 जणांनी लस घेतली आहे.
11 जणांची कोरोनामुक्ती
जिल्ह्यातील 11 जण कोरोना मुक्त झाले असून, आतापर्यंत 2 लाख 71 हजार 768 जण कोरोना मुक्त झाले आहेत. दरम्यान, 3 जण बाधित आढळून आले असून आतापर्यंत 2 लाख 79 हजार 179 जण झाले आहेत. काल दिवसभरात 539 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली. 29 जण सक्रिय रुग्ण असून 3 जण रुग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.35 वर पोहचला आहे.
मंगळवारी
नमुने-539
बाधित-03
मृत्यू-00
मुक्त-11
सक्रिय-29
मंगळवारपर्यंत
नमुने-25,67,543
बाधित-2,79,179
मृत्यू-6683
मुक्त-271760









