किर्तनकार सुहासबुवा वझे यांचा वारीतील परिक्रमा
फोंडा : धालोत्सव, लइराईचा जत्रोत्सव, दिवजोत्सव आदी गोमंतकीय उत्सवामधून भक्ती वाढीस लागावी यासाठी सामुहिक नामजप, सत्संग व प्रबोधन करणाऱ्या किर्तनकार सुहासबुवा वझे यांनी पंढरपूरच्या वारीतही हे भक्तीसुत्र जोडले आहे. आषाढी एकादशीनिमित्त गोव्यातून पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसोबत एक दिवस वारी करीत प्रबोधन, सत्संग व सेवा हा परिक्रमा त्यांनी नुकताच पूर्ण केला. दोडामार्ग ते तिळारीपर्यंच्या या प्रवासात गोव्यातील आठ वारकरी मंडळांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या. ‘अवघ्या देहाची पंढरी… ती वारी’ असे सांगत ही वारी आषाढी एकादशीपुरती न राहता हा भक्तीचा जागर गोव्यात अखंड सुऊ ठेवण्याचे आवाहन वारकऱ्यांना केले.
यंदा डिचोली तालुक्यासह गोव्याच्या अन्य भागातून हजारभर वारकरी पायी वारीला निघाले आहेत. त्यात वयस्क नागरिकांबरोबरच महिला व तऊणांची संख्याही लक्षणीय आहे. गोमंतक संत मंडळातर्फे सुहासबुवा वझे यांनी गेल्या वर्षीपासून एक दिवसाची वारी व त्यात सत्संग, प्रबोधन व सेवा हा परिक्रमा सुऊ केला आहे. सकाळी दोडामार्ग येथून वारकऱ्यांच्या गाठीभेटींना सुऊवात करण्यात आली. वायंगणतड येथील सिद्धीविनायक मंदिरात मुक्कामाला थांबलेल्या डिचोली येथील श्री भक्त पुंडलिक वारकरी मंडळाच्या वारकऱ्यांसोबत हरिनामाचा गजर व काहीवेळ सत्संग केला. त्यानंतर तेरवणमेढे, तिळारी घाट, वीजघर, हेरे आदी गावांतून मार्गक्रमण करीत वारकरी पथकांशी संवाद साधला. मेढे येथे रामकृष्ण हरी वारकरी मंडळ गावकरवाडा डिचोली, तिळारी घाटमाथ्यावर श्री सातेरी भगवती माऊली वारकरी मंडळ हळदोणे, वीजघर येथे ओम नमो ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळ अमरावती आमोणे, केळबाई सातेरी वारकरी मंडळ, मुळगाव यांच्यासोबत विठ्ठल नामाचा गजर, सत्संग व प्रबोधन करण्यात आले. परतीच्या प्रवासात मुळगांव वारकरी संस्था तसेच भेडशी येथे ज्ञानदेव माऊली मंडळाच्या पथकाची भेट घेण्यात आली. काही पथकांमध्ये पन्नास तर काही मंडळासोबत दिडशे ते दोनशे वारकरी यंदा पायी वारीला निघाले आहेत. काही वारकरी गेली बारा वर्षे सलग पायी वारी करीत असून काही मंडळांनी गेल्या दोन वर्षांपासून वारीला सुऊवात केली आहे. वारकऱ्यांचे प्रबोधन करताना वझेबुवांनी त्यांना वारीचे महत्त्व, विठ्ठल भक्ती, सामाजिक एकता या गोष्टींचे महत्त्व सांगितले. शिवाय ही वारी आषाढी एकादशीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण गोव्यात सामुहिक भक्तीचा अखंड प्रचार व प्रसार होण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी येणाऱ्या काळात गोव्यातच एकादिवसाच्या वारीचे प्रयोजन करण्याचा संकल्प बोलून दाखविला. बहुतेक वारकरी पथकांनी या संकल्पनेचे स्वागत केले. सुहासबुवा वझे यांच्यासोबत देवानंद सुर्लकर, राजेंद्र गावडे, संतोष कुर्टीकर, मनोज वझे, मनिषा दामले, प्रभावती वझे, दया मावजेकर, रवींद्र कामत, रामदास वळवईकर, रचना वळवईकर, भक्ती वळवईकर, किशोर गावडे, विष्णू गवस तसेच पत्रकार नरेंद्र तारी व सदानंद सतरकर हे सहभागी झाले होते.
पाय चेपून वारकऱ्यांची सेवा
पायी वारीला निघालेल्या वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह व उर्जा असून तिळारीचा घाट हा वारीतील महत्त्वाचा टप्पा अनेक वयस्क व महिला वारकऱ्यांनीही पायी चालत पार केला. वझेबुवा व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाटेत भेटणाऱ्या वारकऱ्यांची सेवा म्हणून त्यांना खाद्यपदार्थ व पिण्यासाठी कशाय दिला. काही वारकऱ्यांच्या पायांना तेल लावून मसाज करण्यात आले. या सेवेमुळे वारकरी भारावून गेले.
वारकऱ्यांप्रती प्रचंड आदर व भक्तीभाव
पायी वारीला निघालेल्या या वारकऱ्यांना वाटेत लागणाऱ्या गावातील ग्रामस्थांनी शक्य तेवढी मदत कऊन वारकऱ्यांप्रती आदरभाव व्यक्त करण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. रात्री मुक्कामाला थांबणाऱ्या वारकऱ्यांच्या जेवणा नास्त्याची सोय काही ग्रामस्थ स्वच्छेने करीत आहेत. शाळा व मंदिरांकडून मुक्कामाची सोय केली जात आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वारकऱ्यांला माऊली असे संबोधीत त्यांच्या पायांना स्पर्ष कऊन नमस्कार करीत भक्तीभाव व्यक्त करणारे गावकरी भेटतात. तेव्हा वारकऱ्यांचा मन भऊन येते. वयस्क पुऊष, महिला व शालेय विद्यार्थ्यांकडून आजही हा आदरभाव व्यक्त करण्याची परंपरा सुऊ आहे.









