प्रतिनिधी/ पणजी
वाहतूक नियमांबाबत पोलिसांनी कडक धोरण राबविले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. शुक्रवार 17 मार्च रोजी एकाच दिवसात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1924 वाहन चालकांविरोधात कारवाई करून तब्बल 10.75 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
राज्यात वाहन अपघातांचे सत्र सुऊ असून, वाहन चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्यामुळे अधिकाधिक अपघात होत असल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. वाहन चालक नियमांचे पालन करीत असल्यास अपघातांवर नियंत्रण येऊ शकते मात्र तसेच होत नसल्यामुळेच पोलिसांना कडक कारवाई करावी लागते.
शुक्रवारी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी मांद्रे येथे विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई केली.









