मालमत्ता नोंदणी-दस्तऐवजाची प्रक्रिया गतिमान
बेंगळूर
1 ऑक्टोबरपासून मालमत्तांच्या मार्गसूची दरात वाढ होणार असल्याने मालमत्ता कर नोंदणी प्रक्रियेला वेग आला आहे. बुधवारी एकाच दिवशी 26,058 मालमत्ता नोंदणी होऊन 311 कोटी ऊपयांचा विक्रमी महसूल तिजोरीत जमा झाला. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता नोंदणी-दस्तऐवजाची प्रक्रिया होऊन सर्वाधिक शुल्क वसूल करण्यात आल्याचा मुद्रांक व नोंदणी विभागाच्या इतिहासात नवा विक्रम आहे. सोमवारी 158.28 कोटी ऊपयांच्या 15,936 नोंदणी दस्तऐवजांवर प्रक्रिया करण्यात आली होती. आता 2 दिवसांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्मयता असून महसूल व नोंदणी विभागाने आणखी एक टप्पा गाठला आहे. 22 सप्टेंबर रोजी 12,955 मालमत्तेची नोंदणी होऊन 130.87 कोटी महसूल जमा झाला होता. तर 25 सप्टेंबर रोजी 158.28 कोटी सरकारी तिजोरीत जमा झाले होते.









