जिल्हा रुग्णालयात सुरू होते उपचार : आणखी बारा पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 568
- जिल्हय़ात 399 जण कोरोना मुक्त
- कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 158
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी एका दिवसात कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या आता अकरावर पोहोचली आहे. तसेच जिल्हय़ात शुक्रवारी आणखी 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. बाराजणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी दिली. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये कुडाळ तालुक्मयातील कसाल येथील एकजण, सावंतवाडी तालुक्मयातील निरवडे येथील एक महिला आणि वास्को (गोवा) येथील एकाचा समावेश आहे.
जिल्हय़ात शुक्रवारी आणखी 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामध्ये मालवण तालुक्मयातील रेवतळे – तीन, देवबाग – दोन, देऊळवाडा – एक, कणकवली तालुक्मयातील तळेरे – एक, देवगड तालुक्मयातील मुणगे -एक, कुडाळ तालुक्मयातील कुसबे – एक, सावंतवाडी तालुक्मयातील माडखोल येथील एक आणि रॅपिड टेस्टमध्ये दोन पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांची गावे समजू शकली नाहीत. नव्याने 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण रुग्ण संख्या 568 झाली आहे.
12 जणांना डिस्चार्ज
जिल्हय़ात बरे होणाऱया रुग्णांचे प्रमाणही वाढत असून शुक्रवारी आणखी 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 399 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात 158 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
कंटेनमेंट झोन
कणकवली तालुक्मयातील वारगाव-रोडयेवाडी येथील ईरफान अलीसाहेब मुल्ला यांचे घर व 50 मीटरचा परिसर 26 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत, दोडामार्ग तालुक्मयातील कुंब्रल-बोर्डेवाडी येथील अश्विनी आनंद बोर्डेकर चव्हाण यांच्या घरालगतचा 50 मीटरचा परिसर 27 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 9040
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 568
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 8159
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 313
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 158
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 399
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 23104
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 4052
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 197385
सद्यस्थितीत सक्रिय कंटेनमेंट झोन 55









