आणखी सातजणांची प्रकृती चिंताजनक : नव्याने 46 पॉझिटिव्ह, 37 जणांना डिस्चार्ज
- कोरोना मुक्त : 3,374
- कोरोना सक्रिय : 883
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असताना मृत्युमुखी पडणाऱया रुग्णांची संख्या वाढली आहे. धक्कादायक म्हणजे गुरुवारी एकाच दिवशी सातजणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत 111 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गुरुवारी 46 पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळले, तर 37 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
पॉझिटिव्ह रुग्णांमधून सात रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 4 हजार 268 झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 3 हजार 374 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात 883 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील रुग्ण स्थिती
गुरुवारी नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 46
सद्यस्थितीतील सक्रिय रुग्ण 883
कोरोनामुक्त झालेले रुग्ण 3374
कोरोनाने मृत झालेले रुग्ण 111
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 4,268
चिंताजनक रुग्ण 7
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण
देवगड 281
दोडामार्ग 185
कणकवली 1453
कुडाळ 969
मालवण 316
सावंतवाडी 535
वैभववाडी 137
वेंगुर्ले 389
जिल्हय़ाबाहेरील रुग्ण 13
तालुकानिहाय कोरोना सक्रिय रुग्ण : देवगड – 43, दोडामार्ग – 52, कणकवली – 269, कुडाळ – 248, मालवण – 60, सावंतवाडी – 94, वैभववाडी – 13, वेंगुर्ले – 98, जिल्हय़ाबाहेरील – 6.
तालुकानिहाय गुरुवारी आढळलेले पॉझिटिव्ह मृत्यू : देवगड – 7, दोडामार्ग – 2, कणकवली – 25, कुडाळ – 19, मालवण – 11, सावंतवाडी – 29, वैभववाडी – 8, वेंगुर्ले – 9 आणि जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 1
आतापर्यंत तपासणी केलेले कोरोना अहवाल आरटीपीसीआर टेस्ट तपासलेले एकूण नमुने 17,727. पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 3,171, तर ऍन्टेजिन टेस्ट तपासलेले एकूण नमुने 11,300. पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 1,197.
मृत्यू रुग्णसंख्या : देवगड – 1, कणकवली – 3, कुडाळ – 1, सावंतवाडी – 1, वेंगुर्ले – 1.
कोरोनाने आणखी सातजणांचा मृत्यू
मृत्यू झालेल्या सात रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. वेंगुर्ले तालुक्यात रेडी येथील 82 वर्षांच्या व्यक्तीस उच्च रक्तदाब, कंपवात, दीर्घकालीन श्वसन विकार होता. कुडाळ तालुक्मयातील पिंगुळी येथील 67 वर्षांच्या महिलेस उच्च रक्तदाब व ह्रदयविकार होता. सावंतवाडी तालुक्मयातील मळगाव येथील 52 वर्षांच्या व्यक्तीस मधुमेह होता. कणकवली येथील 61 वषीय महिलेस उच्च रक्तदाब व मधुमेह होता. तर याच शहरातील 82 वषीय व्यक्तीस उच्च रक्तदाबाचा त्रास होता. कणकवली तालुक्मयातील सांगवे येथील 75 वषीय महिलेचा वार्धक्मयामुळे मृत्यू झाला, तर देवगड येथील 73 वषीय व्यक्तीस फुफ्फुसाचा कर्करोग होता, अशी माहिती देण्यात आली.









