मुंबई \ ऑनलाईन टीम
भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी ईडीकडून केली जात होती. आता त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे कारण ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. तब्बल ५ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
काही दिवसापूर्वी एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसेंवर ही मोठी कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.
Previous Articleश्रीपेवाडीत 550 जणांना कोरोना प्रतिबंधक लस
Next Article तासगावात ट्रक सोडण्यासाठी मागितली ३० हजाराची लाच








