मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कार्यकर्त्यांपासून अनेक राजकीय मंडळीकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी देखील राज ठाकरे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. खडसेंनी राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्यामुळे सोशल मीडियावर मात्र याची जोरदार चर्चा चर्चा रंगली आहे.
ट्विटरवर राज ठाकरे यांचा फोटो शेअर करत एकनाथ खडसेंनी अभिष्टचिंतन केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राज ठाकरे जी… आज आपला जन्मदिवस. त्यानिमित्त आपले मनःपूर्वक अभिष्टचिंतन !,असे ट्विट राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे.
सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचं संकट आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही. त्यामुळे वाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका. तुमच्या घरीच राहा, असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच केलं होतं.
कितीही ठोकाचे विरोधक असले तरी महाराष्ट्राने आपली परंपरा नेहमीच जपली आहे. चांगल्या प्रसंगी असेल किंवा संकटाच्या काळत राजकीय मंडळी राजकारण बाजूला ठेऊन सर्व कार्यक्रमात सहभागी होताता. कधी कुणाच्या तब्येतेची विचारपूस करायची असेल किंवा एकाद्या लग्न कार्यात सहभागी व्हायचे असेल सर्वजण सर्व हेवेदावे बाजूला ठेवून सहभागी होत असतात व एकमेंकाना भेटत असतात व एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देत असतात.








