प्रतिनिधी / बेळगाव :
कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. यामुळे सर्व सामान्यांचे जगणे असहय़ बनत चालले आहे. यामुळे कोरोनाचे निवारण व्हावे आणि हे संकट दूर व्हावे. या मागणीसाठी कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळाच्यावतीने श्री शनैश्वर मंदिरात गुरुवारी शनी यज्ञ (होम) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनैश्वर जयंतीनिमित्त यज्ञ करून कोरोनाचे निवारण व्हावे अशी प्रार्थना करण्यात आले. उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्याहस्ते हा कार्यक्रम पार पडला.
शुक्रवारी शनैश्वर जयंती आणि अमावस्या असून यानिमित्त मंडळाच्यावतीने यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अनिल बेनके आणि त्यांचा भाचा निलेश सावंत यांच्याहस्ते शनैश्वर मुर्तीचे पूजन करण्यात आले. शुक्रवारी मंडळाच्यावतीने परिसरातील आठ ते दहा गल्लीत प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. मार्गदर्शक नारायण किटवाडकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते बाळकृष्ण तोपिनकट्टी, राजू भातकांडे, राजू हुब्बळकर, विकी बेंगाळे, सदानंद हावळ, बाबाजी हट्टीकर, सिद्धार्थ भातकांडे, बाळू काकतकर, जोतिबा कांगले, मनोज जाधव, विजय पवार, सुनिल चौगुले, विजय उकली, सुधाकर चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.









