काँग्रेस नेते राहुल गांधींचे पंतप्रधानांवर टीकास्त्र
नवी दिल्ली / ऑनलाइन टीम
कोरोनामुद्यावरुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून वारंवार टीका होत आहे. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांनवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटद्वारे ‘एक तो महामारी, उस पर प्रधान अहंकारी’ अशा शब्दात टीका केली आहे. कोरोनाच्या ढीसाळ नियोजनावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हा निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी वारंवार आक्रमरित्या देशातील कोरोना मुद्यावरुन सामान्यांची होणारी ससेहोलपट समोर ठेवत टीका करत केंद्र शासनाला सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून धारेवर धरलं आहे. यासोबतच राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांनी केंद्रावर केलेल्या आरोपांचा आधार घेत कोरोना महामारीने देशाला घट्ट विळखा घातला असताना पंतप्रधानांचा कारभार नियोजन शून्य असल्याचे स्पष्ट केलं आहे.
सुरेश जाधव यांनी काय केला होता आरोप
लसीच्या तुटवड्यास केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप सीरम इन्स्टिट्यूटने केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कोरोना लसीकरण महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. देशात 18 वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार असल्याचं घोषित करण्यात आलं. पुणे स्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकारनं लसीच्या साठ्याबाबत काहीही माहिती न घेता आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) गाईडलाइन्सवर विचार न करताच 18 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली.








