गोडोली / प्रतिनिधी :
अतिपर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणावर आघात झाला आहे. याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय सामाजिक व न्याय राज्य न्याय मंत्री ना. रामदास आठवले आज भरपावसात जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी वाई तालुक्यातीलकोंडवले येथे भेट दिली. यावेळी नुकसानग्रस्तांना एकटे नाही तुम्ही शक्य ती मदत मिळवून देण्यासाठी साथ आहोत आम्ही, अशा शब्दांत आधार दिला. केंद्र शासनाकडून काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णा वायदंडे प्रदेश, जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ गालफाडे यांनी थेट ना.रामदास आठवले यांना माहिती दिली. यावेळी राज्याच्या दौऱ्यावर असताना सातारा जिल्ह्यात येऊन पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे सांगितले.
सोमवार दि.24 रोजी जिल्ह्यातील अधिकारी आणि आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर मोठा पाऊस पडत असताना हि वाई तालुक्यात प्रत्यक्ष नुकसानग्रस्तांना भेटून आधार दिला. एकटे नाही तुम्ही साथ आहोत आम्ही, असा आधार दिला.









