ऑनलाईन टीम / मुंबई :
आर्थिक डबघाईला आलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी सरकारने मार्चपर्यंत निविदा मागविल्या आहेत. टाटा समुह ही कंपनी सिंगापूर एअरलाईन्सच्या सहकार्याने खरेदी करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी बोली लावण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
88 वर्षांपूर्वी म्हणजेच 1932 मध्ये जेआरडी टाटांनी एअर इंडियाचा पाया रचला होता. त्यानंतर 1946 मध्ये त्याचे राष्ट्रीयकरण झाले. त्यामुळे टाटा एअरलाईन्सचे नाव एअर इंडिया झाले. आता आर्थिक डबघाईला आल्यामुळे सरकारने मार्चपर्यंत ही कंपनी व्रिकीसाठी निविदा मागविल्या आहेत.
टाटा ग्रुप एअर इंडिया विकत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. टाटा सिंगापूर एअरलाईन्स आणि विस्तारा एअरलाईन्समध्ये भागीदार आहे. आता विलीनीकरण करुन टाटा तिसरे विमान चालविण्याचा विचार करत आहे. त्यासाठी एअर एशियामध्ये 49 टक्के भागधारक असलेल्या मलेशियन उद्योजक टोनी फर्नांडिस यांची परवानगी घेण्यात येत आहे.









