कर्जाच्या ओझ्याने वाकलेली ‘एअर इंडिया’ ही हवाई वाहतूक कंपनी ‘टाटा सन्स’ने १८ हजार कोटी रुपयांना खरेदी केली आहे. विविध कारणांमुळे कर्जजर्जर झालेली ही कंपनी खरीदण्यासाठी देशातून आणि परदेशातूनही फारशा कंपन्या उत्सुक नव्हत्या. दरम्यान मोदी सरकारकडून आज अधिकृतपणे एअर इंडियाची मालकी टाटांकडे हस्तांतरित करण्यात येणार होती. मात्र आता त्यासाठी अजून एक दिवस वाट पहावी लागणार आहे. शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडणार आहे.
एअर इंडियाची मालकी आता टाटा ग्रुपकडे येणार असून मालकी हक्क हस्तांतरित करण्याची कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. दरम्यान टाटा ग्रुपकडून प्रवाशांसाठी रतन टाटांच्या आवाजात जेवणाची विशेष ऑफरही देण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारी टाटा ग्रुपकडे अधिकृतपणे मालकी येईल असं सांगितलं जात होतं. पण आता त्यासाठी अजून एक दिवस वाट पहावी लागणार आहे.
बुधवारी रात्री 10 च्या सुमारास, नवीन मालक पदभार कधी स्वीकारणार या प्रतिक्षेत असलेल्या एअर इंडियाच्या कर्मचार्यांना एक ईमेल आला. यामध्ये त्यांना की हस्तांतरित योजना सध्या प्रलंबित ठेवण्यात आल्याची माहिती दिली. दरम्यान विमानामधील जेवणाची प्रस्तावित योजना प्रलंबित नसल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे.
याआधी २७ जानेवारीला टाटा सन्सकडे महाराजाचं अधिकृत हस्तांतरण केलं जाईल असं सांगण्यात आलं होतं. बुधवारी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना तसा मेलही करण्यात आला होता. हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी तयारी करा असं त्यांना यात सांगण्यात आलं होतं. यामध्ये काही देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय विमानांमधील जेवणासंबंधीही सूचना करण्यात आली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









