प्रतिनिधी /बेळगाव
इंडियन एअरफोर्सच्या 89 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सांबरा येथील एअरमन टेनिंग स्कूलच्यावतीने सायकलफेरीचे आयोजन करण्यात आले होते. एका आठवडय़ाच्या या सायकलफेरीची सांगता सोमवारी बेळगाव येथे झाली. स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन अरुण मिट्टू यांच्या हस्ते झेंडा दाखवून 4 ऑक्टोबरला या सायकलफेरीला सुरुवात झाली होती.
आरोग्य व साहसी खेळांविषयी सर्वसामान्यांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने ही सायकलफेरी आयोजित केली होती. सांबरा येथून सुरू झालेली ही सायकलफेरी दांडेली, कारवार, यल्लापूर, कित्तूरमार्गे सांबरा अशी काढण्यात आली. एकूण 500 कि. मी. चा प्रवास करण्यात आला. यामध्ये एअरफोर्सच्या जवानांचा सहभाग होता.









