अनेक वैशिष्टय़पूर्ण सुविधांचा समावेश
नवी दिल्ली : 2020 हे वर्ष ऍपल या कंपनीसाठी लाभदायक ठरले आहे. कंपनीने गेल्या 11 महिन्यांमध्ये अनेक नवी उत्पादने लाँच केली. एअरपॉड मॅक्स या नव्या उत्पादनाचे लाँचिंग नुकतेच भारतीय बाजारपेठेत करण्यात आले असून यात अनेक सुविधा आहेत. ऍपलचा हा प्रथमच ‘ओव्हर द इयर’ हेडफोन असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यासह येणाऱया सुविधांमुळे तो लवकरच भारतात लोकप्रिय होईल असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी आधीच एअरपॉड बुक केला असून 15 डिसेंबरपासून विक्री सुरू होत आहे.
कोरोनाकाळातील कठोर निर्बंध हटविण्यात आल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत आहे. तसेच प्रलंबित ठेवण्यात आलेली खरेदी आता सुरू करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. अशा स्थितीत जास्तीत जास्त नवी उत्पादने बाजारात आणण्याचा इलेक्टॉनिक साधनांच्या कंपन्यांचा विचार आहे.
वैशिष्टय़े…
- स्पेस गे, सिल्व्हर, स्काय ब्ल्यू, ग्रीन आणि पिंक अशा पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध
- किंमत 59,000 हजार रूपयांच्या घरात असून चोखंदळ ग्राहकांसाठी हे उत्पादन आहे
- ऍपलची एच 1 चिप, काँप्युटेशनल ऑडिओ आणि ध्वनीची उच्च गुणवत्ता
- मॅग्नेटिक इयर कुशन्समुळे सुविधा. बिघडल्यास 6,500 रूपयांमध्ये रिप्लेस केली जाणार