नवी दिल्ली
दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आरोग्य ऍप अपोलो 24/7 यांच्यासोबत भागीदारी केली आहे. कंपनी याच्यामधून एअरटेल आपल्या ग्राहकांना थँक्स ऍपच्या आधारे ई आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आहे. कंपनीने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार एअरटेल प्लॅटिनम आणि गोल्ड श्रेणी ग्राहकांना अपोलो सर्कलची सदस्यता प्राप्त करून देणार असल्याचे संकेत आहेत. यामध्ये अपोलोचे प्रमुख आणि विशेष तज्ञ डॉक्टर ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ऑनलाईन शोधातून बुकिंगसोबत घराचा शोध घेत ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचा अंदाज आहे. थँक्स ऍपच्या मदतीने अपोलो सर्कलची 12 महिन्यांची सदस्यता असलेल्यांना एअरटेल गोल्ड ग्राहकांसाठी 3 महिन्यांची सदस्यता मोफत देणार असल्याची माहिती आहे.









