वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रति÷sचे स्थान असलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी होणाऱया ऍशेस क्रिकेट मालिकेचे भारतात पहिल्यांदाच चार भाषांमध्ये समालोचन होणार आहे. ही मालिका सोनी स्पोर्ट्स नेटवर्कतर्फे प्रक्षेपित केली जाणार आहे.
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील 2021 ची ऍशेस मालिका 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स या चॅनेलवर इंग्रजी भाषेमध्ये तसेच सोनी टेन-3 वाहिनीवर हिंदी भाषेत, सोनी टेन-4 चॅनेलवर तामिळ आणि तेलगू भाषेत होणार आहे. या मालिकेसाठी हिंदी भाषेतील समालोचन प्रख्यात समालोचक विवेक राजदान, साबा करीम, आतीष ठुकराल, रमण भानोत, स्नेहल प्रधान आणि रितेंदर सिंग सोधी करणार आहेत. तामिळ भाषेतील समालोचन माजी क्रिकेटपटू एस. शिवरामकृष्णन, उरकेरी रमण, तसेच विद्युत शिवरामकृष्णन, एस. शेषाद्री आणि अरुण वेणुगोपाल करणार आहेत. या आगामी ऍशेस मालिकेतील पहिली कसोटी 8 डिसेंबरला ब्रिस्बेनमध्ये खेळविली जाईल. ऍशेस मालिकेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने 33 तर इंग्लंडने 32 वेळा विजतेपद मिळविलेले आहे.









